मुंबई : दलालांकडून अकरा महिन्‍यांत दीड कोटींची तिकिटे जप्त; मध्य रेल्वेची कारवाई (Central Railway) | पुढारी

मुंबई : दलालांकडून अकरा महिन्‍यांत दीड कोटींची तिकिटे जप्त; मध्य रेल्वेची कारवाई (Central Railway)

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसच्या आरक्षित तिकिटांची दलाली करणाऱ्या ३२७ दलालांवर मध्य रेल्वेच्या (Central Railway)  पोलीस दलाने (आरपीएफ) कारवाई केली. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत ८ हजार ३३७ तिकिटे जप्त केली. त्यात ई-तिकिट आणि काउंटर तिकिटांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ४७ लाख ३१ हजार १२१ रुपयांची तिकीटे वसूल करण्यात आली.

मेल-एक्सप्रेसचे आरक्षित तिकिट काढण्यासाठी नागरिक सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर रांगा लावतात. परंतु आरक्षण खिडकी उघडताच आरक्षित तिकिटे संपतात. त्यामुळे प्रवाशांना वेटिंगचे तिकिट घ्यावे लागते. परंतु वेटिंगचे तिकिट कन्फर्म होत नसल्याने प्रवासी आरक्षित तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रवाशांच्या याच अडचणींचा फायदा तिकिट दलाल घेतात. प्रवाशांना जादा पैसै मोजून आरक्षित तिकिट देतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक फसवणूक होते. (Central Railway)

रेल्वे तिकिटांचा काळाबाजर रोखण्यासाठी आरपीएफ सतत तिकीट दलालांवर कारवाई करते. कोरोनाच्या संक्रमणानंतर लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते आहे.त्याताच फायदा तिकिट दलाल घेत आहेत. मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ३२७ तिकिट दलालांना अटक केली आहे. तर २८८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Central Railway  : एकूण गुन्हे दाखल – २८८

अटक- ३२७

जप्त ई-तिकिटे- ७४२२

काउंटर तिकिटे- ९१५

या कारवाईत भविष्यात केल्या जाणाऱ्या प्रवासाची आणि केलेल्या प्रवासाची अशा दोन्ही प्रकारच्या तिकिटांचा समावेश आहे. केल्या जाणाऱ्या प्रवासाची ४० लाख २७ हजार ८७५ रुपये आणि केलेल्या प्रवासाची १ कोटी ७ लाख ३ हजार २४६ रुपये किंमतीच्या तिकिटांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button