ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सील

ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सील

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावरून बुधवारी झालेल्या ठाकरे-शिंदे गटाच्या राड्यानंतर गुरुवारी शिवसेनेसह महापालिका मुख्यालयातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व समाजवादी पार्टीचे कार्यालय सील करण्यात आले.

दरम्‍यान, पक्ष कार्यालयात येऊन महापालिकेतील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडणाऱ्या सामान्य मुंबईकरांना आता आधारच नाही. शिंदे गटाच्या या राड्यामुळे पक्ष कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपलाच हक्क असे सांगितले. शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कळताच त्‍यांनी मुंबई महापालिकेत धाव घेतली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई पोलिसांना आवर घालणे कठीण झाले होते. अखेर बीएमसीचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना इमारतीबाहेर काढले.

. हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news