Share Market Today | सुरुवातीच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण | पुढारी

Share Market Today | सुरुवातीच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण

Share Market Today : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी आज मंगळवारी (दि.२७) सुरुवातीच्या व्यवहारात वधारला होता. सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी वाढून ६०,८६० वर गेला होता. तर निफ्टी १८ हजारांवर पोहोचला होता. पण त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास दोन्ही निर्देशांकांत घसरण पहायला मिळाली.

चीनने परदेशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय रद्द केला आहे. यामुळे आशियाई शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.  हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वगळता आशिया-पॅसिफिक बाजारांतील निर्देशांक मंगळवारी हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी खाली आला आहे. जपानच्या निक्केई २२५ आणि शांघाय कंपोझिटमध्ये प्रत्येकी ०.४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे, तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.४९ टक्क्यांनी वाढला आहे.

एनएसईवरील डेटानुसार, सोमवारी (दि.२६) परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ४९७.६५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,२८५.७४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

काल सोमवारी सेन्सेक्स ७२१ अंकांच्या वाढीसह ६०,५६६ वर तर निफ्टी १८ हजारांजवळ जाऊन बंद झाला होता.

अमेरिकेतील हिमवादळाचा पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याच्या चिंतेने मंगळवारी तेलाची किंमत किचिंत वाढली. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button