

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंड केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीकडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसदेमध्ये मी 'AU' हे नाव घेतल्यामूळे हा कट रचण्यात आला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला मी कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने मदत केली होती. तिने मला व माझ्या कुटूंबियाना वारंवार धमक्या दिल्या आहेत. या पाठीमागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हात आहे. माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आज ( दि. २५) माध्यमांशी बोलताना केला.
या वेळी राहुल शेवाळे म्हणाले, "माझं राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने मी मदत केली होती. नंतर तिच्या अपेक्षा वाढत गेल्या. ती महिला मला पैशांसाठी वारंवार कॉल करु लागली. पैसे देण बंद केल्यानंतर तिने मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वारंवार माझ्या पत्नीला धमकीचे कॉल करु लागली."
माझ्यावर आरोप करणारी महिला डान्सबारमध्ये काम करते. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. तिचा भाऊ जेलमध्ये आहे. माझ्या तक्रारीनंतर ती महिला मुंबईवरुन दुबईला पळून गेली. तिथे तिने पाकिस्तानी एजंटच्या मदतीने फेक अकाउंट चालवलं. या अकाउंटवरुन मला पैशांची मागणी होवू लागली. पत्नीलाही या अकाउंटवरुन धमकी येवू लागली. असाही आरोपही राहुल शेवाळे यांनी आरोप करणाऱ्या महिलेवर केले.
माझ्यावरील आरोप खोटे आहेत. महिलेल्या ठाकरे गटातील नेत्यांची फुस आहे.या प्रकरणात राष्ट्ररवादीच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. मी बंड केल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादीडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलेला युवासेनेतील पदाधिकारी लोक ट्विटरला फॉलो करत आहेत, असेही ते म्हणाले.
हा माझ्या विरुद्धचा आंतरराष्ट्रीय कट आहे. संसदेत मी AU हे नाव घेतले म्हणून हा कट रचला गेला आहे. महिलेच्या वकिलांनी सेटलमेंटसाठी पैसे मागितले आहेत. माझ्यावर आरोप करणारी महिला ही दाऊद टोळीशी संबंधित आहे. तिला राष्ट्रवादीची फूस आहे. कारण राष्ट्रवादीचे दाऊदशी संबंध आहेत. असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला होती.
हेही वाचा