पारगाव : बंदिस्त गटारे, पुलांच्या कठड्यांची कामे अपूर्ण | पुढारी

पारगाव : बंदिस्त गटारे, पुलांच्या कठड्यांची कामे अपूर्ण

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्व भागातून गेलेल्या अष्टविनायक रस्त्यावर गतिरोधक, पुलांच्या कठड्यांची तसेच बंदिस्त गटारांची कामे अनेक ठिकाणी अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
अष्टविनायक रस्ता नागापूर, पारगाव परिसरातून रांजणगाव गणपतीकडे जातो. या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

पारगाव परिसरात बंदिस्त गटारांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. रांजणी गावच्या हद्दीत धुमाळवस्ती येथे रस्त्यावर खडी पसरली आहे. तेथे खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. पारगावमधील भीमाशंकर कारखाना रस्त्यावरील गटार बंदिस्त करण्यात आलेले नाही. या परिसरात शाळा असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी अद्यापही गतिरोधक उभारण्यात आलेले नाहीत. पारगाव फाट्यावरील धोकादायक वळणावर गतिरोधकाची नितांत गरज आहे. संबंधित ठेकेदाराने ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.

Back to top button