

Share Market Updates : संभाव्य जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.१९) स्थिर सुरुवात केली होती. पण त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात आले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २३० अंकांनी वाढून ६१,५०० वर तर निफ्टी ६७ अंकांच्या वाढीसह १८,३०० वर गेला. त्यानंतर सेन्सेक्स ४६८ अंकांनी ६१,८०६ वर तर निफ्टी १५१ अंकांनी वाढून १८,४२० वर बंद झाला.
आगामी तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी उलाढालीचा अंदाज समोर आल्यानंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) स्टॉक ०.५ टक्क्यांने घसरले. वैयक्तिक शेअर्समध्ये सन फार्मा सुमारे २ टक्क्यांनी घसरला. मुख्यतः आयटी शेअर्समध्ये विक्रीचा जोर वाढला. दरम्यान, एफएमसीजी शेअर्समध्ये जोरदार खरेदी पहायला मिळाली. तर आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज एनएसई ०.५१ टक्क्यांनी आणि भारती एअरटेल एनएसई २.२७ टक्क्यांनी वधारला.
आयशर मोटर्स, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, डॉ रेड्डीज आणि भारती एअरटेल हे निफ्टी ५० वर टॉप गेनर्स होते. तर टाटा मोटर्स, इन्फोसिस, बीपीसीएल, टीसीएस आणि विप्रोचे शेअर्स या निर्देशांकात टॉप लूजर्स होते.
एम अँड एम, बजाज ॲटो, टीव्हीएस मोटर, हिरो मोटोकॉर्प, मारुती, भारत फॉर्ज, अशोक लेलँड या ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
आजच्या व्यवहारात निफ्टीवर आयटी निर्देशांक घसरला. विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल, टीसीएससह सर्व आयटी शेअर्समध्ये लाल रंगात व्यवहार करत होते. यंदाच्या वर्षी निफ्टी आयटी निर्देशांक २५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि या वर्षातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांपैकी तो एक आहे.
सरकार साखरेचा निर्यात कोटा वाढवू शकते, असे वृत्त समोर आल्यामुळे शुगर स्टॉक्समध्ये सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाली. बजाज हिंदुस्थान शुगर, श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी मिल्स, दालमिया भारत शुगर आणि धामपूर शुगर मिल्स यांचे शेअर्स तेजीत आहेत.
NSE बँक निफ्टी निर्देशांक १८८ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी वाढला. यामुळे बँक निफ्टीने आजच्या व्यवहारात ४३,४०० चा टप्पा ओलांडला.
आजच्या व्यवहारात आशियातील बहुतांश प्रमुख बाजारांवर दबाव दिसून येत आहे. SGX निफ्टी ०.२० टक्क्यांनी वाढला आहे तर निक्केई निर्देशांक १.११ टक्क्यांनी घसरला आहे. तर हँगसेंगमध्ये ०.०२ टक्क्यांनी खाली आला आहे. तैवान वेटेडमध्ये ०.३९ टक्के आणि कोस्पीमध्ये ०.३५ टक्के घट झाली आहे. तर वेळी शांघाय कंपोझिट १.२० टक्क्यांनी घसरला आहे.
हे ही वाचा :