मुंबई : घाटकोपर येथील पारख हॉस्पिटलला भीषण आग | पुढारी

मुंबई : घाटकोपर येथील पारख हॉस्पिटलला भीषण आग

पुढारी ऑनलाईन : मुंबईतील घाटकोपरमधील पारख हॉस्पिटलच्या  इमारतीला आज ( दि. १७ ) भीषण आग लागली आहे. यानंतर रूग्णालयालयातील काही रूग्णांना राजावाडी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.  काही रूग्ण हे रूग्णालयातच अडकले आल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पारख रूग्णालयातील हॉटेल असलेल्या इमारतीला ही आग लागली आहे. या भीषण आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीत कोणत्याही प्रकारे नुकसान झालेली माहिती अद्याप समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णालयाच्या जवळील विश्वास इमारतीत असलेल्या पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याने ही घटना घडली. आत्तापर्यंत आगीतील २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

हेही वाचा:

Back to top button