

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आदी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्यावतीने आज ( दि.१७ ) हल्लाबोल मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी झाले आहेत. ही आंदोलनाची सुरूवात आहे. काय करायच ते करा, गोळ्या घाला किंवा तुरूंगात टाका, आंदोलन यापुढे चालूच राहील, असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांना दिला.
आम्ही महाराष्ट्र प्रेमी म्हणून रस्त्यावर उतरलो आहोत. म्हणून भाजप आंदोलन करत आहे का? इतका मुर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल. महाराष्ट्राची जनता आज महापुरूषांचा अपमान झाल्याने रस्त्यावर उतरली आहे. खर तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. उलट तेच आम्हाला अडवत आहेत. इतक निर्लज्ज सरकार महाराष्ट्रात झालं नसेल, अशी टीका राऊत यांनी केली.
सत्ताधाऱ्यांची डोकी तपासायला पाहिजेत यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे. सरकार आमची मागणी पूर्ण करू दे किंवा नाही करूदे, दिल्लीला महाराष्ट्राची ताकद दाखविण्यासाठी हा मोर्चा आहे. या सरकारला महाराष्ट्रात निर्लज्ज सरकार म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानानंतरही राज्यपालांना हटविण्याची मागणी सरकार करत नाही. या सरकारला जनताच उत्तर देईल. यापुढेही आंदोलन चालूच राहील. काय करायच ते करा गोळ्या घाला किंवा तुरूंगात टाका, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा :