

मुंबई; पुढारी ऑनलाईन : kirit somaiya : कोल्हापूर प्रवेशापासून रोखल्यानंतर भाजप नेते यांनी मुंबईत परतल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
महाराष्ट्र घोटाळामुक्त करणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. सरकारने बेकायदेशीर ६ तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोपही किरीट सोमय्या kirit somaiya यांनी केला. घोटाळामुक्त प्रशासन करून दाखवू असे ते यावेळी म्हणाले.
किरीट सोमय्या मुंबईत परतल्यानंतर कार्यकर्ते जमले होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच, पण मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरही टिकास्त्र सोडले. मुंबईत रेमडेसीवीर खरेदीत ७७ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
लोकांच्या विश्वासाला जगणार आहोत, महाराष्ट्र घोटाळामुक्त करणार आहोत, आता एका गंभीर लढाईला सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरेंच्या अलीबाबा चालीस चोर मंत्रिमंडळावर कारवाई होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
येत्या सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या बंगल्याची गोरेगावला पाहणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ३० सप्टेबरला जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात लोकांची सेवा करायची सोडून स्वत:चे खिसे भरल्याचा आरोप ठाकरे सरकारवर केला. कोरोना काळात ठाकरे सरकारचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?
[visual_portfolio id="40694"]