Hinduja Group : हिंदुजा करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक ! | पुढारी

Hinduja Group : हिंदुजा करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंदुजा समूहाने (Hinduja Group) महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरूवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन त्याचे अदानप्रदान करण्यात आले. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, – फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन बँकिंग- आणि नव तंत्रज्ञान या ११ क्षेत्रांत हा उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहे.महाराष्ट्रातील भूमिपुत्र म्हणून हिंदुजा समूहाने या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी समूहाचे कौतुक केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून उद्योगांच्या परवान्यांसाठी एकखिडकी योजना सुरु केली आहे. लवकरच यासंदर्भातील कायदा आणला जाईल.

Hinduja Group : मी महाराष्ट्राचा : जी. पी. हिंदुजा

अतिशय कमी वेळेत हा सामंजस्य करार होत असल्याबद्दल जी. पी. हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मी महाराष्ट्रातील असून आम्ही १९१४ पासून इथे राहतो. राज्याच्या प्रगतीसाठी अमेरिका, इंग्लंड येथील उद्योजक मित्रांनाही महाराष्ट्रात आम्ही गुंतवणुकीसाठी आणू. या सामंजस्य करारांची गतीने अंमलबजावणी करणार असल्याचेही हिंदुजा म्हणाले.

हेही वाचा

Back to top button