बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७१ वे वार्षिक अधिवेशन ‘इंदुर’ला; उपमुख्मंत्री फडणवीसांची असणार प्रमुख उपस्थिती | पुढारी

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७१ वे वार्षिक अधिवेशन 'इंदुर'ला; उपमुख्मंत्री फडणवीसांची असणार प्रमुख उपस्थिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या इंदुर (मध्यप्रदेश) नगरीत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित या अधिवेशनातून वार्षिक सर्वसाधारण सभा, परिचर्चा, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यांची माहिती, मान्यवर तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मराठी भाषिकांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती मंडळाचे प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर यांनी पत्रकातून दिली आहे. मंडळाच्या संलग्न संस्थांच्या परिचय ‘संस्था संवाद’ या विशेष कार्यक्रमातून अधिवेशन स्थळी दिला जाणार असल्याचे कुंभोजकर यांनी सांगितले.

अधिवेशनात देशभरातून सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रस्तुतींसाठी ‘मुक्त मंच’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोरोना महारोगराईमुळे गेल्या दोन दिवसांपासून भव्य असे अधिवेशन भरवण्यात आले नव्हते. केवळ एक दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यंदा कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्याने भव्य स्वरुपात अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button