कुर्ला : टॅक्सी चालकांना प्रवासी बनून लुटणारी टोळी गजाआड | पुढारी

कुर्ला : टॅक्सी चालकांना प्रवासी बनून लुटणारी टोळी गजाआड

कुर्ला, पुढारी वृत्‍तसेवा : प्रवासी बनून टॅक्सी चालकांना निर्मनुष्य ठिकाणी नेऊन लुटणारी टोळी नेहरू नगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीने दोन टॅक्सी चालकांना मरीन ड्राईव्ह व कुर्ला पश्चिम येथे प्रवासी असल्याचे सांगून टॅक्सी बाप्पा कॉलनी चेंबूर येथे निर्मनुष्य ठिकाणी आणली. या टॅक्सी चालकांने चाकूचा धाक दाखवून जखमी केले आणि टॅक्सी चालकाकडे असलेला मोबाईल व रोख रक्कम अशी लुटून या टोळीने पोबारा केला होता. या प्रकरणी या दोन्ही टॅक्सी चालकांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार ४ तासांच्या आत या टोळीतील ३ आरोपी व १ विधीसंघर्षगस्त बालक यांना जेरबंद केले. अर्जुन राजू भोपारिया,संजय अशोक उजिरपुरिया, लेखराज पदमराम नंगलिया या ३ आरोपीना अटक करण्यात आली असून या गुन्हयातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यात वारंवार वाहन चालकांना अश्याच प्रकारे लुटले जात असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.हेही वाचा  

बिग बॉस मराठी सिझन चौथा : राखी सावंतला भांडी घासावी लागणार..

कोल्‍हापूर : बुबनाळ ग्रामपंचायत सरपंचपदी सुप्रिया मालगांवे बिनविरोध

जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Back to top button