Twin Sisters Marriage : जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्कादायक माहिती उजेडात

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यभर एका लग्नाची गोष्ट खूप चर्चेत आहे. एका तरुणाशी उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकच मांडवात लग्न केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभर या लग्नाची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. या प्रकरणी पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच राज्य महिला आयोगाने त्याला नोटीसही बजावली आहे. आता या कहानीमध्ये ट्विस्ट (Twin Sisters Marriage) आलं आहे. जाणून घेवूया काय आहे ते ट्विस्ट.
Twin Sisters Marriage : एकाच मांडवात जुळ्या बहिणींशी विवाह
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथील अतुल अवताडे नावाच्या तरुणाने कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींशी लग्न एकाचवेळी केलं. त्या दोघी मुंबईतील आयटी कंपनीत इंजिनीअर आहेत. हा विवाह शुक्रवारी (दि.२) अकलूज-वेळापूर रोडवरील एका कार्यालयात झाला होता. वरमाला घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला आणि या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरु झाली. अतुल हा मुंबई येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय करतो. काही महिन्यापुर्वी पिंकी आणि रिंकी यांच्या आईची तब्येत बिघडली तेव्हा अतुलने त्यांना मदत केली. दोघींपैकी एकीचं अतुलवर प्रेम जडलं. पिंकी आणि रिंकी जुळ्या बहिणी. दोघीही नेहमी एकत्रच राहत असत. त्यामुळे या दोघींनीही अतुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर शुक्रवारी (दि.२) पाहुण्यांच्या उपस्थित जुळ्या बहिणींनी एकाचवेळी अतुलबरोबर विवाह केला.
नवरदेवावर गुन्हा
रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. याच्या आधारे पोलिसांनी अतुल अवताडे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
कहानी में ट्विस्ट
जुळ्या बहिणींच्या लग्नाची चर्चा झाली आणि गुन्हाही दाखल झाला;पण हे प्रकरण इथपर्यंतचं थांबलं नाही. या कहानीत आणखी एक ट्विस्ट आलं. हे ऐकुन पुन्हा एकदा चर्चेला उधाणं आलं आहे. ट्विस्ट असं आहे की, अतुलचं पहिलं लग्न झालं आहे. जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न पहिल्या पत्नीला मान्य नाही. तिने पोलिस ठाण्यात अतुल विरुद्ध तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. यामुळे आता अतुलसह त्याच्याशी लग्न केलेल्या जुळ्या बहिणींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
- जुन्नर : जुनी घरे, वाडे चोरट्यांचे लक्ष्य; भरवस्तीत प्रकार घडत असल्याने नागरिक भयभीत
- Aftab-Shraddha Case : श्रद्धाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबला राजकारणात रस; विचारतोय गुजरात, हिमाचल निवडणुकीत…
- Indonesia bans sex outside marriage | इंडोनेशियात नवीन कायदा, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास एक वर्षाची शिक्षा, ‘लिव्ह-इन’मध्ये राहणे हाही गुन्हा