मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्मृती जागविण्यासाठी मोफत बस टूर | पुढारी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्मृती जागविण्यासाठी मोफत बस टूर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मोफत बस टूर सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा, बीआयटी चाळ (परेल) आणि सिद्धार्थ कॉलेज (फोर्ट) अशा महत्त्‍वाच्‍या ठिकाणी मोफत बस टूरने भेट देता येणार आहे. आज (दि.४) या टूरच्या पाच बसेसना विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला.

आज सकाळी ९.३० च्या सुमारास दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून या मोफत बसफेरीला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकरांसह पर्यटक,  बाबासाहेबांचे अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी आमदार दरेकर यांनी पर्यटकांशी संवादही साधला.

प्रवीण दरेकर म्हणाले की, बाबासाहेबांची स्मृतीस्थळे असणारी पंचतीर्थ मुंबई शहरात आहेत. चैत्याभूमी, सिद्धार्थ कॉलेज, आंबेडकर कॉलेज, राजगृह, बीआयटी चाळ या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जाण्याची संधी बाबासाहेबांच्या अनुयायांना या मोफत बसमधून प्राप्त होणार आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेसाठी हा एक अभूतपूर्व असा उपक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरु झाला आहे. या निमित्ताने नव्या पिढीलाही बाबासाहेबांची जी स्मृतीस्थळे, बलस्थाने आहेत, त्याचे दर्शन व प्रेरणा घेता येईल, असे दरेकर यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button