ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन सादर करण्यास मुभा, मुदतही वाढवली | पुढारी

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन सादर करण्यास मुभा, मुदतही वाढवली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता त्यामध्ये अंशत: दुरूस्ती करून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील.

.हेही वाचा  

पिंपरी : न्यायालयाचे काम लवकर पूर्ण करा; न्यायमूर्तींचे महापालिका प्रशासनाला ‘अल्टिमेटम

नाशिक : देवळ्यात पाच ठिकाणी धाडी टाकत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद; जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते : सदाभाऊ खोत

Back to top button