Share Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात | पुढारी

Share Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात

Share Market Today : गुंतवणूकदारांना जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदराबाबत परस्परविरोधी संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात घसरण दिसून आली. गुरुवारच्या विक्रमी उसळीनंतर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीने सावध सुरुवात केली आहे. सेन्सेक्सने ६२,३०० वर तर निफ्टीने १८,५०० वर सुरुवात केली. त्यानंतर सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. तर निफ्टीही १८,५०० च्या खाली आला.

जागतिक बाजारातील संकेत संमिश्र आहेत. दरम्यान, जपानचा निक्की निर्देशांक ०.३८ टक्क्यांनी घसरल्याने आशियाई शेअर्समध्ये घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.१८ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.९२ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी वधारला. दरम्यान, अमेरिकेतील तीनही प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर जाऊन स्थिरावले. (Share Market Today)

NSE डेटानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी एकूण १,२३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी २३६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नोव्हेंबरच्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढीवर नियंत्रण राहणार असल्याचे संकेत दिले. यामुळे काल गुरुवारी (दि.२४) भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊन सेन्सेक्सने विक्रमी पातळी गाठली होती. गुरुवारी सेन्सेक्स ७६२ अंकांनी वाढून ६२,२७२ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांनी वाढून १८,४८४ वर बंद झाला होता. कालच्या सत्रात सेन्सेक्सची ९०० अंकांपर्यंत उस‍ळी पहायला मिळाली. तर निफ्टीने ५२ आठवड्यातील उच्चांक नोंदवला.

सेन्सेक्स ६२ हजारांवर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी ६२,२४५ चा टप्पा गाठला होता. बँक निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला आणि प्रथमच तो ४३ हजारांवर बंद झाला.

हे ही वाचा :

Back to top button