भीमा कोरेगाव प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर | पुढारी

भीमा कोरेगाव प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई : पुढारी ऑनलाईन : भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  एनआयएच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे.

आनंद तेलतुंबडे यांच्यावर कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्याशी संबंध असल्याच्या आरोप आहे. त्यांना एप्रिल २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेशी तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय तपासयंत्रणेला होता. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणी नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

हे ही वाचा :

 

 

Back to top button