Sushma Andhare Vs Gulabrao Patil : गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरलेत का? – सुषमा अंधारे | पुढारी

Sushma Andhare Vs Gulabrao Patil : गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरलेत का? - सुषमा अंधारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणाचीही तक्रार नसताना माझ्या सभेला परवानगी नाकारली. माझ्या भाषणात कोणताही असंसदीय शब्द नव्हता, कोणाचाही ऐकेरी उल्लेख नाही तरीही आक्षेप का? नेमका आक्षेप कशावर आहे. आमचा शिवसेनेचा घाव विरोधकांना वर्मी लागला आहे. गुलाबराव मला घाबरलेत का? असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील (Sushma Andhare Vs Gulabrao Patil ) यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची (Sushama Andhare) यांच्या महाप्रबोधन यात्रेदरम्यानच्या भाषणांना परवानगी नाकारण्यात आल्याचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.  जळगावातील मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात त्यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली. जळगावमध्ये काल (दि.४) सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. परंतु, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. पण  सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांकडून नजरकैद करण्यात आले होते. त्या ऑनलाईन सभा घेण्याची शक्यता होती. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सभा काल झाल्या नाहीत.
Sushma Andhare Vs Gulabrao Patil : सत्तेचा गैरवापर
आज एका  वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्या यावेळी म्हणाल्या, “सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा गेैरवापर सुरु आहे. मला ओलीस ठेवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला गेला. नेमका आक्षेप कशावर आहे? माझ्या भाषणात एकही असंसदीय, असंवैधानिक शब्द नव्हता, शब्द नव्हता, कोणाचाही एकेरी उल्लेख नव्हता. मग नेमका कशावर आक्षेप आहे.  कोणाचीही तक्रार नसताना माझ्या सभेला परवानगी का नाकारली? याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. गुलाबरावांना भिती का वाटते माझी, असे म्हणत त्या सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, माझ्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाकरे गट आन राईट ट्रॅक आहे. शिवसेनेचा  घाव विरोधकांना वर्मी लागला आहे. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबद्दल विचारलं असत त्या म्हणाल्या, मी राष्ट्रवादीची कधीही प्राथमिक सदस्य नव्हते. माझ ओपन चॅलेंज आहे, मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य होते हे कोणीही माहितीच्या अधिकाराखाली शोधावे.

हेही वाचा

Back to top button