Special Pocso court : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला ‘जन्मठेप’, बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाची लढाई | पुढारी

Special Pocso court : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला 'जन्मठेप', बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाची लढाई

पुढारी ऑनलाइन डेस्क : Special Pocso court : उत्तर प्रदेश येथी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 27 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Special Pocso court : या प्रकरणाची माहिती अशी की, हे प्रकरण 2021 मधील आहे. उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन शेजा-यांनी बलात्कार केला. आरोपींचे वय अनुक्रमे 25 आणि 27 वयोगटातील आहे. बलात्कारानंतर आरोपींनी मुलीला धमकावले. त्यामुळे तिने याबाबत कोणालाही सांगितले नाही. मात्र, या घटनेतून तिला गर्भ राहिला. त्यामुळे 5 महिन्यांनी तिचे बेबी बंप दिसू लागले असता भावाने तिला याबाबत विचारले. त्यावेळी तिने या बलात्काराच्या घटनेला वाच्यता फोडली.

Special Pocso court : त्यानंतर आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा दिला. त्याने प्रथम पोलिसांकडे धाव घेत यासंबंधी फिर्याद दिली. फिर्याद दिल्यामुळे दोन्ही आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या धमक्यांमुळे त्यांना उत्तरप्रदेश सोडून पंजाबमध्ये पळून जावे लागले.

Special Pocso courtदरम्यान, मुलीने एका बाळाला जन्म दिला. मात्र, ते बाळ जिवंत राहिले नाही. दुसरीकडे त्यांनी दोघांनी न्यायासाठी कायदेशीर लढा देत राहिले. या दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. तसेच पीडितेच्या भावाने तिला पुन्हा हिंमतीने जगण्यासाठी उभे केले आणि प्रोत्साहन दिले.

Special Pocso court : अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (पोक्सो) शामली, मुमताज अली यांनी आरोपींना 50 हजाराचा दंड ठोठावला तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हे ही वाचा :

पुणे : माजी अपर आयुक्त ताब्यात

नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास

 

Back to top button