

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा गोरेगाव स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. या गोंधळामुळे 6 लोकल रद्द केल्या आहेत, तर 70 लोकलला लेट मार्क लागला आहे. या शिवाय लांब पल्याच्या 6 गाड्यांना याचा फटका बसला आहे. यात वंदेभारत एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. कामावर जाण्याची वेळ असतानाच हा बिघाड झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
गोरेगाव रेल्वे स्थानकात आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी अप आणि डाउन जलद मार्गांवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सिग्नल बिघाड दुरुस्त करून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत केली. परंतु तोपर्यंत लोकलचे बंचिंग झाले होते. याचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बसला.
हेही वाचा :