Gold Prices Today | सोने, चांदी दरात घट, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Prices Today | सोने, चांदी दरात घट, जाणून घ्या नवे दर

Gold Prices Today : ऑक्टोबरमध्ये लग्नसराई सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सोने- चांदी दरात किचिंत घट दिसून येत आहे. सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५०,७०० रुपयांच्या जवळपास आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४३२ रुपयांवर आहे. दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचाच अधिक वापर केला जातो.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी (Gold Prices Today) २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५०,६९० रुपये, २३ कॅरेट ५०,४८७ रुपये, २२ कॅरेट ४६,४३२ रुपये, १८ कॅरेट ३८,०१८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर २९,६५४ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदी ५१६ रुपयांनी स्वस्त होऊन दर प्रति किलो दर ५८,५३२ रुपयांवर आला आहे. लग्नसराईत सोन्याला मागणी वाढते. यामुळे सराफा बाजारात मोठी उलाढाल होते.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button