

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना संधी देण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस भरती संदर्भातील जाहिरात काढली होती. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला विरोध केल्यामुळे सरकारने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. (Police Bharati)
राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. जवळपास १५ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र कोरोना काळात भरती होऊ न शकल्याने वय उलटलेल्या उमेदवारांना संधी मिळावी, हा पोलीस भरतीमागील स्थगितीचा सरकारचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. (Police Bharati)
दरम्यान, बडनेराचे भाजपा समर्थक आमदार रवि राणा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलीस भरती रद्द करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत शिंदे यांनी राणा यांना सोमवारी वर्षा निवासस्थानी बोलवले आहे.
हेही वाचा