Share Market Today | शेअर बाजाराची स्थिर सुरुवात, सेन्सेक्स ६० हजारांजवळ | पुढारी

Share Market Today | शेअर बाजाराची स्थिर सुरुवात, सेन्सेक्स ६० हजारांजवळ

Share Market Today : संमिश्र जागतिक संकेतांमुळे भारतीय निर्देशांकांनी शुक्रवारी (दि.२८) सकाळी स्थिर सुरुवात केली आहे. सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ५९,९०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ५५ अंकांनी वाढून १७,८०० च्या आसपास होता. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ घटक सुरुवातीच्या व्यवहारात वाढले. मारुती सुझुकी, RIL हे टॉप गेनर्स होते. दरम्यान, दोन्ही निर्देशांकात प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स ४४९.९१ अंकांनी म्हणजे ०.७५ टक्क्यांनी घसरून ५९३०६.९३ वर होता आणि निफ्टी ५५ अंकांनी म्हणजेच ०.३१ टक्क्यांनी घसरून १७,६८२ वर होता. त्यानंतर बाजार खुला होताच दोन्ही निर्देशांक वर गेले.

दरम्यान, आज शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ११ पैशांनी वाढून ८२.३८ वर खुला झाला. गुरुवारी रुपया ८२.४९ वर बंद झाला होता. (Share Market Today)

बँक ऑफ जपानच्या व्याजदराच्या निर्णयामुळे आशियातील समभाग घसरले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६३ टक्क्याने घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी किंचित खाली आला होता. हाँगकाँगमधील हँग सेंग निर्देशांक ०.१ टक्के घसरला. तर चीनमधील शांघाय कंपोझिट ०.५८ टक्क्यांनी घसरला आहे.

प्रमुख बँका येत्या काही महिन्यांत व्याजदर वाढीचा वेग कमी करतील या अपेक्षेने काल गुरुवारी (दि.२७) आशियाई समभाग वाढले होते. या पार्श्वभूमीवर तसेच मेटल समभागातील मजबूतीमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.२७) तेजी दिसून आली. निर्देशांकांनी मागील सात सत्रांत वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून ५९,७५६ वर बंद झाला होता. निफ्टी ८० अंकांनी वाढून १७,७३६ वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button