टॅक्सी उशिरा आल्याने विमान चुकले; Uberला २० हजारांचा दंड – Consumer Forum fines Uber | पुढारी

टॅक्सी उशिरा आल्याने विमान चुकले; Uberला २० हजारांचा दंड - Consumer Forum fines Uber

टॅक्सी उशिरा आल्याने विमान चुकले; Uberला २० हजारांचा दंड

मुंबई, पुढारी ऑनलाईन – ग्राहक न्यायालयाने Uberला २० हजार रुपयांचा दंड केला आहे. टॅक्सी उशिरा आल्यामुळे विमान चुकल्याने Uberला हा दंड करण्यात आला आहे. टॅक्सी उशिरा आल्यामुळे आणि त्यानंतर विमान चुकल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये आणि न्यायालयीन कामकाजासाठी १० हजार रुपये असा हा दंड आहे. (Consumer Forum fines Uber)

ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे. डोंबिवली येथील वकील कविता शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. शर्मा यांना १२ जून २०१८ला विमानाने मुंबईतून चेन्नईला जायचे होते. मुंबईतून सायंकाळी ५.५० मिनिटांनी विमान सुटणार होते. विमानतळावर जाण्यासाठी त्यांनी Uberची टॅक्सीसेवा घेतली होती. डोंबिवलीतून विमानतळ जवळपास ३६ किलोमीटर अंतरावर आहे. शर्मा यांनी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी टॅक्सी बुक केली. ही टॅक्सी १४ मिनिटं उशिरा आली. विमानतळावर टॅक्सी पाच वाजता पोहोचेल असे अॅपवर दाखवले जात होते.

पण टॅक्सी सुरू झाल्यानंतर चालक फार धिम्यागतीने कार चालवत होता. फोनवर बोलत, त्यानंतर एकदा CNG भरण्यासाठी असा वेळ असे करत शेवटी ५ वाजून २३ मिनिटांनी टॅक्सी विमानतळावर पोहोचली. त्यामुळे शर्मा यांची फ्लाईट चुकली. शिवाय टॅक्सी बुक करत असताना ५६३ रुपये इतके भाडे दाखवले जात असताना टॅक्सीचे भाडे ७०३ रुपये इतके आकारण्यात आले.

शर्मा यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे उबर इंडिया विरोधात तक्रार दाखल केली. उबरचे मत असे होते की त्यांची कंपनी फक्त सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ग्राहक आणि टॅक्सी चालक यांना एकत्र आणते. पण ग्राहक मंचाने कंपनीची बाजू फेटाळून लावत २० हजार रुपायांचा दंड केला.

हेही वाचा

Back to top button