ऑनलाईन मागवली महाराजा भोग थाळी अन् अकाऊंटवरून उडाले ८ लाख ४६ हजार रुपये | पुढारी

ऑनलाईन मागवली महाराजा भोग थाळी अन् अकाऊंटवरून उडाले ८ लाख ४६ हजार रुपये

पुढारी ऑनलाईन : मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन महाराजा भोग थाळी मागवली आणि चक्क तिच्या अकाऊंटवरून ८ लाख ४६ हजार रूपये उडाले. या महिलेने एका सोशल माध्यमावरील २०० रूपये ‘महाराजा भोग थाळी’ (Buy One Get One Free) या जाहिरातीवर क्लिक केले आणि या फसव्या जाहिरातीमुळे महिलेला ८ लाख ४६ हजार रूपयांना गंडा लागला. सदर महिलेने याची तक्रार वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.

ऑनलाईन महाराजा भोग थाळी बुक करताना या लिंक मेसेजमध्ये रिमोट ॲक्सेस ॲप आणि रिमोट ॲक्सेस ॲपही डाऊनलोड झाले. या रिमोट ॲक्सेसला महिलेने परवानगी दिली आणि सायबर भामट्यांनी या महिलेला लाखोंचा चूना लावला. या ५४ वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर भामट्याने अकाऊंट ॲक्सेस मिळाल्यानंतर २७ वेळा व्यवहार केला आणि तब्बल ८ लाख ४६ हजार या महिलेला गमवावे लागले.

हेही वाचा:

Back to top button