पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागालाही निर्देश देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news