Bomb In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध मॉलमध्ये बॉम्ब! पोलिसांना संशयास्पद कॉल, सुरक्षा वाढवली | पुढारी

Bomb In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध मॉलमध्ये बॉम्ब! पोलिसांना संशयास्पद कॉल, सुरक्षा वाढवली

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bomb In Mumbai : ”मुंबईतील प्रसिद्ध मॉल आणि विमानतळावरील एका नामांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवले आहे,” असा एक निनावी कॉल मुंबई पोलिसांना बुधवारी आला. अनोळखी कॉलरकडून अनेक ठिकाणी बॉम्बच्या धमक्या आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. हेल्पलाइन क्रमांक 112 वर संशयास्पद फोन कॉल आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bomb In Mumbai : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलरकडून शहरात इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा आला होता. मुंबई पोलिसांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. अज्ञात फोन करणाऱ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Bomb In Mumbai : यापूर्वी कर्नाटकमध्ये देखिल हिजाब आंदोलनादरम्यान शाळेत बॉम्ब ठेवल्याचा कॉल पोलिसांना आला होता. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचण्यात येत आहे, असे सांगितले होते. तसेच शाळा संपूर्णपण सुरक्षित आहेत. आम्ही कॉल करणा-याचा शोध घेत आहोत. पालकांनी याबाबत काळजी न करता निश्चिंत राहण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा :

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका कधी ? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

मुंबई : मेट्रो-3 बाधितांचे शिवसेनेच्या नेतृत्त्वात आंदोलन

 

Back to top button