Share Market Today | घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत | पुढारी

Share Market Today | घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

Share Market Today : कमकुवत जागतिक संकेतामुळे सोमवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारही घसरणीसह खुला झाला होता. आज सोमवारी (दि.१७) सेन्सेक्स १३० अंकांनी घसरून ५७,७०० वर खुला झाला होता. तर निफ्टी १७,१०० वर खुला झाला होता. त्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीची घसरण थांबून तो वधारला. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून ५८, १९१ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी १७,२०० वर व्यवहार करत होता. बजाज ऑटो, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये दिसले.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आणखी व्याज दरवाढीच्या शक्यतेने अमेरिकेतील प्रमुख वॉल स्ट्रीट निर्देशांकांची कामगिरी खालावली आहे. याचे पडसाद आशियाई शेअर बाजारात दिसून येत आहेत. (Share Market Today) दरम्यान, भारतीय शेअर बाजार यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

बँकिंग आणि आयटी शेअर्संमधील तेजीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता. सेन्सेक्स ६८४ अंकांनी वाढून ५७,९१९ वर बंद झाला होता. तर निफ्टी १७१ अंकांनी वधारुन १७,१८५ वर बंद झाला होता. BSE वर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक अनुक्रमे ३१ अंकांनी घसरले आणि २.३० अंकांनी वाढले होते. बँकिंग आणि आयटी शेअर्स BSE वर अनुक्रमे ७५४ अंकांनी आणि ४५९ अंकांनी वाढले होते.

शुक्रवारी सेन्सेक्स वधारल्याने गुंतवणूकादारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा झाला होता. यामुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६९.८५ लाख कोटींवरुन २७३.२३ लाख कोटींवर पोहोचले होते. सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक ३.९५ टक्क्यांनी ‍वधारले. तर इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग हिरव्या रंगात गेले होते.

क्रिप्टोकरन्सी बाजार तेजीत

दरम्यान, सोमवारी सकाळी क्रिप्टोकरन्सी बाजार तेजीत दिसत होता. आंतरराष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ०.१९ टक्क्यांनी वाढले आहे. सध्याचे क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९१८.२३ अब्ज डॉलर आहे. बिटकॉइन, इथेरियम आणि बीएनबी या क्रिप्टोकरन्सी गेल्या २४ तासांत वधारल्या आहेत. बिटकॉइन १९,१९७ डॉलरवर व्यवहार करत असून त्यात ०.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button