

Share Market Today : सलग तीन सत्रातील घसरणीनंतर आज बुधवारी (दि.१२) शेअर बाजार सावरला. आज सकाळी बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वधारुन ५७,३०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही १७,००० वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स, निफ्टी तेजीत आल्याने आयटी, ऑटो समभाग वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीने सुरुवात केली आहे.
काल मंगळवारी सेन्सेक्स ८४३ अंकांनी खाली येऊन ५७,१४७ वर बंद झाला होता. तर निफ्टी २५७ अंकांच्या घसरणीसह १६,९८३ वर बंद झाला होता. आज शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. (Share Market Today)
दरम्यान, आशियाई स्टॉक्स वॉल स्ट्रीटवर रात्रभर झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. जपानचा निक्की निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा KOSPI ०.३७ टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक २.०३ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट १.१० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
जागतिक मंदीची वाढती जोखीम आणि चीनमध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंध लादल्यामुळे इंधनाच्या मागणीला फटका बसला आहे. परिणामी आज तेलाच्या किमती सलग तिसऱ्या सत्रात कमी झाल्या आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. यामुळे तेलाचे दर कमी झाल्याचा फायदा देशाला होतो.
हे ही वाचा :