मुंबई : न्हावा शेवा बंदरात ५०२ कोटींचे कोकेन जप्त, फळांच्या पेटीतून आयात | पुढारी

मुंबई : न्हावा शेवा बंदरात ५०२ कोटींचे कोकेन जप्त, फळांच्या पेटीतून आयात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबईजवळील न्हावा शेवा बंदरात पिअर्स आणि हिरवी सफरचंद घेऊन आलेल्या कंटेनरमधून ५०.२३ किलो कोकेन शनिवारी जप्त करण्यात आल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने दिली आहे. या कोकेनची किंमत ५०२ कोटी रुपये आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या पिअर्स आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ६ ऑक्टोबर रोजी न्हावा शेवा बंदरात अडवण्यात आले. या कंटेनरमध्ये डीआरआयच्या मुंबई विभागीय युनिटला ५०.२३ किलो कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा सापडल्या. हे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार आयातदाराला अटक करण्यात आली आहे.

फळांच्या पेटीत लपवून कोकेनची तस्करी केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button