पुढारी ऑनलाइन डेस्क : ICG & ATS Action : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात ATS च्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ, 6 क्रू मेंबर्स आणि 350 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉइनसह पाकिस्तानी बोट अल सक्करला पकडले. आज, 8 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पुढील तपासासाठी बोट जखाऊ येथे आणली. एएनआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
ICG & ATS Action : दरम्यान, काल राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गुजरातमध्ये छापेमारी करुन तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ६० किलो उच्च दर्जाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे एनसीबीने या ड्रग्ज कारवाईमध्ये एअर इंडियाच्या माजी पायलटसह एकूण सहा जणांना अटक केली होती. तर काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील वाशी येथून संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करी करण्यात आलेल्या 1476 कोटी रुपयांचे 207 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
ICG & ATS Action : थोड्या दिवसांपूर्वी गुजरातच्या किना-यावर अशाच प्रकारे तस्करीसाठी ड्रग्ज घेऊन आलेल्या एका पाकिस्तानी बोटला गुजरातच्या समुद्र किना-याजवळ पकडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी पहाटे 350 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉइन असलेली पाकिस्तानी बोट अल सक्कर ही गुजरातच्याच समुद्र किना-याजवळ पकडण्यात आली. हे ICG आणि गुजरात ATS चे मोठे यश मानले जात आहे.
हे ही वाचा :