उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता : नारायण राणे | पुढारी

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा होता : नारायण राणे

पुढारी ऑनलाईन; मुंबई : बाळासाहेबांचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा हा खरा दसरा मेळावा होता, त्यातून आम्हाला विचारांची प्रेरणा मिळायची, सामाजिक कामाची प्रेरणा मिळायची. ज्यामुळे आंम्ही इथवर पोहचलो आहे. पण उद्धव ठाकरेंचा मेळावा फेल होता. तो फक्त तमाशाकारांचा मेळावा होता अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज (दि.७) पत्रकार परिषदेत केली.

शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा पूर्ण फेल मेळावा होता असे स्पष्ट करत मेळाव्यादरम्यान ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांवर केलेल्या टीकेला जहरी भाषेत उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहांवर टीका करण्याची ठाकरेंची पात्रता नाही. यापुढे उद्धव ठाकरेंनी मोदी, शहा, नड्डावर बोलणे बंद केले नाही तर उद्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाकरेंचं हिदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून त्यांना हालचाल करायला जर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते ते कामे काय करणार अशी टीकाही राणेंनी केली. उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते, ते अडीच वर्षात अडीच तास तरी मंत्रालयात आले का तसेच एक तरी काम मराठी माणसासाठी केलंय का? असे सवाल करत ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते मेळाव्यादरम्यान सांगायला हवं होतं असे म्हणाले.

हे वाचलंत का?

Back to top button