Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण, रुपया निचांकी पातळीवर | पुढारी

Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण, रुपया निचांकी पातळीवर

Stock Market Updates : शेअर बाजारात आज शुक्रवारी घसरण दिसून येत आहे. आज प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. तर निफ्टी १७,२७० च्या खाली होता. दरम्यान, शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी खाली येऊन ५८ हजारांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी १७,३०० च्या आसपास व्यवहार करत होता. त्यानंतर सेन्सेक्सची घसरण २५० अंकांपर्यंत वाढत गेली. कमकुवत जागतिक संकेताचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहेत.

काल गुरुवारी बीएसई सेन्सेक्स १५६ अंकांनी वाढून ५८,२२२ वर बंद झाला होता. तर निफ्टीने १७,३०० चा स्तर गाठला होता. परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानंतर धातू, आयटी आणि भांडवली वस्तूंच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. पण आज शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. (Stock Market Updates)

दरम्यान, भारतीय रुपयाची पुन्हा घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ८२.२० वर आले आहे. रॉयटर्सच्या एका सर्वेक्षणानुसार, तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीमुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी निचांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. रुपया या वर्षी १० टक्क्यांपेक्षा अधिक घसरला आहे आणि गुरुवारी तो ८२.२२ या निचांकी पातळीवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाला सावरण्यासाठी विदेशी राखीव चलन साठ्याची विक्री करणे सुरू ठेवले आहे. तरीही रुपयाची घसरण थांबलेली नाही.

हे ही वाचा :

Back to top button