ईव्ही बॅटरीच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, वडिलांकडून कंपनीविरुद्ध ई-खटला | पुढारी

ईव्ही बॅटरीच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, वडिलांकडून कंपनीविरुद्ध ई-खटला

पुढारी ऑनलाइन डेस्क : वसईत इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जिंग लावलेली असताना स्फोट झाला. स्फोटात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी सोमवारी (दि.3) ग्राहक तक्रार पोर्टलवर कंपनी विरोधात ऑनलाइन खटला दाखल केला.
शब्बीर अन्सारी (वय 7) असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याचे वडील शहानवाज अन्सारी यांनी कंपनी विरोधात ग्राहक तक्रार पोर्टलशी संपर्क साधला आहे. ही दुर्घटना 23 सप्टेंबर 2022 रोजी घडली.

शहानवाज अन्सारी हे आपल्या कुटुंबासह वसई (पू) येथील रामदास नगर येथे राहतात. त्यांची दोन मुले मयत मुलगा शब्बीर (वय 7), मुलगी (वय 4), पत्नी शबाना आणि आई रुकसाना असे त्यांचे कुटुंब होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी वसईतील Batt:RE LO:EV ही ईलेक्टिक स्कूटर घेतली होती. 23 सप्टेंबर रोजी शहानवाज अन्सारी यांनी त्यांच्या घरातील दिवाणखान्यात दुपारी 2.30 च्या सुमारास चार्जिंगसाठी त्यांच्या ई-स्कूटर LO:EV ची डिटेचेबल बॅटरी ठेवली होती. त्यांचा मुलगा शब्बीर आणि आई रुक्साना खोलीत झोपले होते.

अंसारी, त्यांची पत्नी शबाना आणि चार वर्षांची मुलगी बेडरूममध्ये होते. तीन तासांनंतर बॅटरीचा स्फोट झाला आणि विजेच्या तारा आणि एलईडी टीव्हीला आगीच्या ज्वालांनी वेढले. शब्बीर हा त्यामध्ये 70 टक्के भाजला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 30 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. तर आई रुक्साना बोटांना किरकोळ दुखापत करून बचावली. माणिकपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांनी काल सोमवारी ई-स्कूटर आणि वसईतील डीलर असेंबल करणाऱ्या जयपूर-आधारित स्टार्ट-अप Batt:RE विरुद्ध ऑनलाइन तक्रार दाखल केली. अन्सारी म्हणाले “मी ग्राहक पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आणखी एका डिलरने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. “कदाचित डीलर्स माझ्याकडे तोडगा काढण्यासाठी येत आहेत, परंतु मी माझा मुलगा गमावला आहे आणि मला न्याय हवा आहे. डीलरने दिलेल्या सूचनेनुसार चार्ज केल्याने स्फोट ओव्हरहिटिंगला दोष देता येणार नाही, असे तो म्हणाला.”

पोलिसांनी सोमवारी रुक्सानाला यांचा जबाब नोंदवला. त्यांनी तिला स्फोट घडवून आणलेल्या घटनाक्रम सांगण्यास सांगितले. कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्यांच्या e-sc-ooter बॅटरी ओकायाने भारतात तयार केल्या आहेत. अन्सारी म्हणाले की त्यांच्या बॅटरीला तीन वर्षांची वॉरंटी आहे. ही बॅटरी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताब्यात आहे.

नगर : सोनेतारणात साडेसहा कोटींनी फसवणूक!

Honda Electric Scooter : होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच…ॲक्टिवापेक्षाही कमी असेल किंमत

Back to top button