Share Market Today : कमकुवत जागतिक संकेतामुळे गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. पण आज मंगळवारी सेन्सेक्सने ही घसरण थांबवत सुरुवातीच्या व्यवहारात ५५० अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीही हिरव्या चिन्हात दिसत आहे. सेन्सेक्स सुमारे ५५० अंकांनी वधारत ५७, ६०० वर व्यवहार करत आहे. निफ्टी १४३ अंकांनी वाढून १७ हजारांवर व्यवहार करत आहे. निफ्टी मिडकॅप ०.७२ टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप १.०१ टक्क्यांनी वाढल्याने मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स मजबूत स्थितीत दिसत होते. गेल्या चार सत्रांमध्ये शेअर बाजाराची ४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली होती.
याआधीच्या सत्रात BSE सेन्सेक्स ९५४ अंक म्हणजेच १.६४ टक्क्यांनी घसरून ५७,१४५ वर बंद झाला होता. तर निफ्टी (NSE) ३११ अंक म्हणजे १.८० टक्क्यांनी घसरून १७,०१६ वर स्थिरावला होता. तर जपानचा निक्की निर्देशांक ०.८३ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा KOSPI ०.२७ टक्क्यांनी, शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.९४ टक्क्यांनी घसरल्याने आशियाई समभागांमध्ये संमिश्र वातावरण आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २२ पैशांनी वाढून ८१.४५ वर पोहोचला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा आशियाई बाजारावर गेल्या काही दिवसांत परिणाम दिसून आला होता. आता हळूहळू भारतीय शेअर बाजारात यातून सावरताना दिसत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या आठवड्यात पुन्हा व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे. (Share Market Today)
हे ही वाचा :