वेटरला टीप म्हणून दिले अडीच लाख आणि आता परत मिळण्यासाठी ग्राहकाची कोर्टात धाव

वेटरला टीप म्हणून दिले अडीच लाख आणि आता परत मिळण्यासाठी ग्राहकाची कोर्टात धाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने वेटरला टीप 2.4 लाख रुपये दिले. त्यानंतर त्या ग्राहकाने ही टीप परत मागायला सुरुवात केली. परंतु ही टीप परत देण्यास रेस्टॉरंटने नकार दर्शवला. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यावर न्यायालय कोणता निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर ग्राहकाने लाखो रुपयाची टीप दिल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील अल्फ्रेडन कॅफेमध्ये एरिक स्मिथ हा जेवण करण्यासाठी गेला होता. यावेळी तेथील होममेड स्ट्रॉम्बोली त्याला खूप आवडली. तसेच रेस्टॉरंटची सेवाही त्याला खूप आवडली. एरिकचे जेवणाचे बिल 13.25 डॉलर इतके आले. बिल भरल्यानंतर एरिकने 3000 डॉलर म्हणजेच सुमारे 2.4 लाख रुपये मारियाना लॅम्बर्ट या वेटरला टीप म्हणून दिले.

पहिल्यांदा या प्रकरणात रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला संशय आला, पण नंतर जेव्हा क्रेडिट कार्डवरून टीपचे पैसे ट्रान्सफर केले गेले, तेव्हा त्याचा संशय दूर झाला. याबाबत वेटर लॅम्बर्ट म्हणला की, एवढ्या मोठ्या टीपची रक्कम माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेस्टॉरंटचे मॅनेजर जेकबसन म्हणाले की लॅम्बर्ट दोन वर्षांपासून येथे काम करत आहे. या टिपचा त्याला खूप फायदा झाला आहे. परंतु जेव्हा एरिक दिलेली टीप परत मागत आहे. असे आम्हाला कळले, त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटले. परंतु रेस्टॉरंट व्यवस्थापनाने लॅम्बर्टला टीप म्हणून मिळालेले २.४ लाख रुपये दिले होते. दरम्यान, रेस्टॉरंटने एरिकशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण एरिकचा संपर्क होऊ शकला नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news