अमृता फडणवीस यांच्‍यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी महिलेला अटक | पुढारी

अमृता फडणवीस यांच्‍यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी महिलेला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी ठाण्यातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबरने याची दखल घेत, ही कारवाई केली आहे. IPC आणि IT कायद्यानुसार संबंधित महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

संबंधित महिलेने फेसबुकवर टिप्पणी करताना, आपली ओळख लपवण्यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर केला होता. अमृता फडणवीस यांनी ७ सप्टेंबरला फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर एका युजरने अवमानकारक शब्दांमध्‍ये कमेंट करत शिवीगाळ केली होती. या महिलेचा शोध घेत, तिला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले असून, न्‍यायालयाने तिला १५ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

Back to top button