Fadanvis-Pawar : फडणवीसांचा अजित पवारांसोबतच्या युतीबाबत मोठा खुलासा : म्ह‍णाले,”ती माझी मोठी…” | पुढारी

Fadanvis-Pawar : फडणवीसांचा अजित पवारांसोबतच्या युतीबाबत मोठा खुलासा : म्ह‍णाले,"ती माझी मोठी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी मत मांडलं. तसेच त्यांनी याआधी केलेल्या युतींबाबतही मोठा खुलासा केला. त्याचबरोबर या मुलाखतीत त्यांनी राज्यातील गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या विविध राजकीय घडामोडींवर देखील मत व्यक्त केलं. ( Fadanvis-Pawar )

 अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातली दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. या दोघांचाही पहाटेचा शपथविधी हा सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. पहाटेच्या शपथविधीमध्ये असं काय बिनसलं की ज्यामुळं अवघ्या दीड दिवसात फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लोकांमध्ये या विषयाबद्दल जाणून घेण्याची कुतुहलता अजूनही कायम आहे. याबाबत एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना फडणवीस म्हणाले, ‘अजित पवारांवर विश्वास ठेवणं माझी सगळ्यांत मोठी राजकीय चूक झाली.’

हेही वाचा

Back to top button