याकुबच्या उद्दात्तीकरणाशी उद्धव ठाकरेंचा संबंध नाही, चौकशी करून कारवाई करा : अरविंद सावंत | पुढारी

याकुबच्या उद्दात्तीकरणाशी उद्धव ठाकरेंचा संबंध नाही, चौकशी करून कारवाई करा : अरविंद सावंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : याकूबचं उद्दात्तीकरण आम्ही केलं नाही. शिवसेना व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. उद्दातीकरणाबाबत चौकशी करून कारवाई करा, उगाच शेपट्या आपटत बसू नका असा हल्लाबोल शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीच्या काळात हे उद्दात्तीकरण झाल्याची टीका भाजपचे नेते करत आहेत. यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना हिंदूत्ववादी सरकारने 2015 ला याकूबला फाशी दिल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांना का दिला, असा प्रतिसवाल केला आहे. उद्धव ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्‍यांनी केली आहे.

याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण हे दुर्दैवी : अंबादास दानवे

याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे दुर्दैवी आहे. कोणाच्या काळात झाले किंवा कोणी माफी मागावी हे व्यर्थ आहे. दहशतवादी याकूबच्या कबरीवर सोन्याचा मुलामा देणे हे निषेधार्थ आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना कबरीचे उद्दातीकरण हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकरणांची सत्तेशी सांगड घालू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button