आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे रक्त वाहत असते. सतत वाहणारे हे रक्त हृदयापर्यंत जाते आणि पंपिंगद्वारे शुद्ध झाल्यानंतर शरीराच्या अन्य मुख्य अवयवांकडे आणि पेशींपर्यंत पोहोचते. हेच रक्त पुन्हा धमण्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवले जाते. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमण्या आकुंचन पावतात, कारण शरीराच्या पेशी रक्त परत पाठवण्यासाठी ताकद लावतात. याच वाहत्या रक्तामध्ये कधी कधी क्लॉट म्हणजेच गुठळी बनते.
ही रक्ताची गुठळी आपोआपच बनते. सामान्य प्रक्रियेमध्ये ही गुठळी क्षतिग्रस्त नलिकांची दुरुस्ती करण्याचे काम देखील करते. असे झाले नाही तर जखम झाल्यानंतर शरीरातील रक्ताचे वाहणे रोखणे अवघड होऊन बसेल. रक्तातील प्लाझ्मामध्ये प्लेटलेटस् आणि प्रोटिन्स असतात. जखम झालेल्या ठिकाणी ते रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून रक्त वाहणे रोखतात. सामान्यपणे जखम बरी झाल्यानंतर रक्ताची गुठळी आपोआप विरघळते; पण रक्ताची गुठळी न विरघळणे आणि दीर्घकाळापर्यंत तशीच राहणे आरोग्यासाठी धोकादायक असते.
त्यासाठी तपासणी आणि उपचाराची गरज असते. उपचार न करता दीर्घकाळ तसेच राहिल्यास रक्ताच्या गुठळ्या धमण्या अथवा नसांमध्ये जातात आणि शरीरातील कुठल्याही भागात म्हणजे डोळे, हृदय, मेंदू, फुफ्फुसे, किडनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अवयवांचे काम बाधित करतात.
डॉ. महेश बरामदे