सोनाली फोगाट खून प्रकरण : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना तपासाचा अहवाल सादर | पुढारी

सोनाली फोगाट खून प्रकरण : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना तपासाचा अहवाल सादर

पणजी; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या खूनप्रकरणी गोवा पोलिस योग्य तपास करत आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केलेली आहे. सोमवारी सायंकाळी सोनाली फोगाट यांच्या खुनाच्या तपासाचा सविस्तर 14 पानांचा अहवाल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पाठवला आहे. त्यानंतरही त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सोमवारी पणजी येथील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्युप्रकरणी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली. या प्रकरणी एकही दोषी सुटणार नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

ड्रग्सचे व्यवहार नष्ट करण्याचे पोलिसांना आदेश राज्यात अमली पदार्थ (ड्रग्ज) नष्ट करण्यासाठी आपले सरकार तथा पोलीस खाते सक्रियपणे कमी काम करत आहे. गोव्यात अमली पदार्थांना थारा नाही. त्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) ला जास्त सक्रिय आणि बळकट करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्या मध्ये अमली पदार्थाचा व्यवहार सुरू आहे तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हवे ते उपाय योजण्याचे पोलीस अधिकार्‍यांना आदेश दिल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा पोलिस आज हरियाणाच्या दिशेनेया प्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी मंगळवार 30 रोजी गोवा पोलिसांचे एक पथक हरियाना येथे रवाना होणार आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेले त्यांचे स्वीय सचिव सुधीर संगवान यांनी दिलेल्या कबुलीनाम्यानंतर फोगाट यांना मारण्याच्या कटात अन्य काहींचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे त्याच चौकशीसाठी गोवा पोलिसांचे पथक हरियाना येथे जाणार असल्योच कळते. चंदीगडच्या फॉरेन्सीक लायब्रोटरीमध्ये ठेवलेला सोनाला फोगाट यांचा अन्नांश (व्हीसेरा) अहवाल लवकर मिळावा यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

Back to top button