जिम ट्रेनरकडे चरस, गांजा सापडला, एनसीबीची घाटकोपरमध्ये कारवाई

जिम ट्रेनरकडे चरस, गांजा सापडला, एनसीबीची घाटकोपरमध्ये कारवाई

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) घाटकोपरमध्ये कारवाई करत एका २४ वर्षीय व्यक्तीला ३.५ ग्रॅम वजनाच्या एक्स्टसी गोळ्या, ५ ग्रॅम गांजा, ३४ ग्रॅम चरस, २५ ग्रॅम चरस आणि एक ग्रॅम एलएसडी पेपरसह बेड्या ठोकल्या आहेत. शुभम भगत असे संशयिताचे नाव आहे. तो पॉवरलिफ्टर आणि जिम ट्रेनर असल्याचे समजते.

एक कुरिअर अमली पदार्थ वाहतूक करत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या मुंबई विभागाने कारवाई करत काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर एनसीबीने पुढील तपास करत विद्याविहार येथील शुभम भगत याच्या घराची झडती घेत आणखी ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल करून शुभमला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news