उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी | पुढारी

उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; अखेर उद्योगमंत्री उदय सामंत तसेच यशवंत जाधव यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यांच्या या बंडाला शिवसेनेतील ४० आमदारांनी साथ दिली. त्यामध्ये उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचादेखील समावेश होता.

उदय सामंत हे तर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र नंतर ते गुवाहाटीला गेले. शिंदे यांनी त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली आहे. तर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला होता. आता उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची हकालपट्टी झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपणाला नितांत आदर आहे. मात्र, काहींनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळ येऊ दिले नाही. काही विचार मला पटले नाहीत, म्हणूनच आपण शिंदे गटात गेलो. पण, जाताना मी कळपाने गेलो नाही. माझी भूमिका स्पष्ट करून एकटा गेलो. माझ्यावर अनेक टीका झाल्या, परंतु, मी त्या सहनही केल्या. अशा टीकांना मी घाबरत नाही. मात्र, त्यातील काही टीका माझ्या जिव्हारी लागल्या असून 2024 च्या निवडणुकीमध्ये या टीकांना चोख उत्तर देईन, असा इशारा नुकताच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीकाकारांना दिला होता.

 हे ही वाचा :

Back to top button