मोठी बातमी : संजय राऊत यांना चार ऑगस्‍टपर्यंत ‘ईडी’ कोठडी

 Sanjay Raut
Sanjay Raut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्‍यायालयाने त्‍यांना न्‍यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली.  तत्‍पूर्वी संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. (Sanjay Raut ED custody)

न्‍यायमूर्ती एम. जी. देशापाडे यांच्‍या न्‍यायालयासमोर आज सुनावणी झाली. ज्‍येष्‍ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्‍या वतीने युक्‍तीवाद केला. तर 'ईडी'कडून हितेन वेणेगावकर यांनी युक्‍तीवाद केला.

आठ दिवसांच्‍या 'ईडी' काेठडीची मागणी

. पत्राचाळ प्रकरणी  संजय राऊत यांचा थेट संबंध आहे. तेच या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. त्‍यांना विदेशी दाैर्‍यासाठी प्रवीण राऊत यांच्‍याकडून पैसे मिळत असत.त्‍यांच्‍या मालमत्ताची व आर्थिक व्‍यवहारांची  सखाेल तपासणी करायची आहे. तसेच संजय राऊत चाैकशीला सहकार्य करत नाहीत. त्‍यांच्‍याकडून अनेक व्‍यवहारांची माहिती घेणे आवश्‍यक आहे. संजय राऊत हे साक्षीदारांवर दबाव आणण्‍याचा व पुराव्‍यांशी छेडछाड करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, पुढील चाैकशीसाठी संजय राऊत यांना ८ दिवसांच्‍या काेठडीची मागणी  'ईडी' च्‍या वकिलांनी केली.

राजकीय सुडापाेटी केली कारवाई : ॲड. मुंदरगी

महाराष्‍ट्रात सत्ता बदल झाल्‍यानंतर काही जणांनी राजकीय सुडापाेटी संजय राऊत यांच्‍यावर कारवाइं करण्‍यात आली आहे, असा युक्‍तीवाद  राऊत यांचे वकील मुंदरगी यांनी केला. प्रवीण  राऊत हे व्‍यवसायिक आहेत . संजय राऊत यांना काेठडी देयची असेल तर कमी कलावधीची द्‍यवी, अशी मागणीही त्‍यांनी  केली.  राऊत यांना हृदविकाराचा त्रास आहे, असेही त्‍यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. तसेच ईडी चाैकशीवेळी वकिलांनाही उपस्‍थित राहण्‍याची परवानगी द्‍यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

रात्री साडेदहानंतर राऊत यांची चाैकशी केली जाणार नाही : 'ईडी'

रात्री साडेदहानंतर राऊत यांची चाैकशी केली जाणार नाही. तसेच त्‍यांना दरराेज एक तास त्‍यांच्‍या वकिलांना भेटता येईल, असे ईडीच्‍या वकिलांनी स्‍पष्‍ट केले. दाेन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर न्‍यायालयाने ४ ऑगस्‍टपर्यंत 'ईडी' कोठडी सुनावली. तसेच ईडी चाैकशीवेळी  राऊत यांच्‍या वकिलांनाही उपस्‍थित राहण्‍याची परवानगी न्‍यायालयाने दिली. मात्र त्‍यांच्‍या वकिलांना

रविवारी झाली हाेती सलग ९ तास चाैकशी

रविवारी सकाळी 'ईडी'च्‍या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील घरावर छापेमारी केली होती तब्‍बल ९ तासांच्‍या चौकशीनंतर त्‍यांना ताब्‍यात घेण्‍यात आले. यानंतर त्‍यांना घेवून ईडी पथक कार्यालयाकडे रवाना झाले. ईडी कार्यालयात त्‍यांची पुन्‍हा सलग चौकशी झाली. मध्‍यरात्री त्‍यांना अटक करण्‍यात आली होती. (Sanjay Raut ED custody)

सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. (Sanjay Raut ED custody)

घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत रविवारी सकाळी राऊतत्यांच्या घरी छापेमारी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news