संजय राऊतांना आणखी एक धक्का : स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री अटक केली. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. त्या विरोधात पाटकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासात झालेला सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा आणि पंजाब अँड महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन ईडी तपास करत आहे. ईडीने रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यावर छापेमारी केली. तब्बल साडेनऊ तासांच्या कारवाईनंतर ईडीच्या पथकाने राऊत यांना ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात आणले. येथे रात्री साडेबारा वाजेपर्यंत चौकशी केल्यानंतर ईडीने राऊत यांना अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकऱणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना लैंगिक अत्याचार आणि जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. त्या विरोधात पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
- Laal Singh Chaddha: सोशल मीडियावर का बॉयकॉट झाला आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’?
- HBD Taapsee Pannu : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे तापसी, लक्झरी कार कलेक्शन आणि बरचं काही…
- संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक