मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. गटनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा खासदार शेवाळे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर त्यांनी किर्तीकर यांची भेट घेतली आहे.
गटनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर खासदार राहुल शेवाळे शनिवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज त्यांनी शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या गोरेगाव निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
हेही वाचा :