कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) वरिष्ठ अधिकारांचे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री छापा टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर परिसरातील गोपनीय ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे या सर्व घडामोडी त स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे. 'एनआयए'च्या छापेमारेमुळे कोल्हापूर जिल्हासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने जवळीक असल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळत नाही. तीस वर्षीय संशयित तरुणाने एका संस्थेची स्थापना करून त्यामार्फत शिक्षण प्रसाराचे काम करत होता अशी ही माहिती सूत्राकडून समजते. राष्ट्रीय तपास संस्थेने राज्यात 13 ठिकाणी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर आणि नांदेड येथील छापा कारवाईचा समावेश असल्याचे समजते.
हेही वाचा :