सोलापूरकडच्या मेल, एक्स्प्रेस रद्द ; 25 जुलैपासून ट्रॅफिक ब्लॉक | पुढारी

सोलापूरकडच्या मेल, एक्स्प्रेस रद्द ; 25 जुलैपासून ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या दौण्ड ते कुर्डुवाडी विभागादरम्यान 25 जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र या कामासाठी मुंबईसह सोलापूर, तसेच अन्य काही विभागांतील मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. परिणामी, चार महिन्यांपूर्वी आरक्षण केलेल्या रेल्वेगाड्या रद्द केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दौण्ड त कुर्डुवाडी दरम्यान 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक राहणार आहे. या काळात रुळाखाली स्लिपर बसविणे, दोन रुळ एकमेकांना छेदतात तेथील ट्रॅक सर्किट बदलण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 25 आणि 26 जुलै रोजी दादर-पंढरपूर एक्स्प्रेस रद्द केली होती. आता 30 जुलै आणि 1 ऑगस्टची दादर-पंढरपूर गाडी देखील रद्द केली आहे. तर गडद एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द केल्या आहेत.

एलटीटी-विशाखापट्टणम ही गाडी अन्य मार्गाने वळवली आहे. सुमारे 25 हून अधिक गाड्या रद्द करतानाच काहींचे मार्गही बदलले आहेत. याची दोन-तीन दिवसांपूर्वी माहिती मिळाल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. एक्स्प्रेस गाड्यांचे चार महिनेआधी आरक्षण करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीच्या इतर पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागणार आहे. तर रद्द केलेल्या गाड्यांची माहिती प्रवाशांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच तिकिटांचा पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

मुंबई सेंट्रल-नंदुरबार एक्स्प्रेस 31 ऑगस्टपर्यंत शनिवारी रद्द

पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या इंटरलॉकिंग आणि अन्य परिवहन कामांमुळे गाडी क्रमांक 19425/6 मुंबई सेंट्रल-नंदुरबार-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस 31 ऑगस्टपर्यंत दर शनिवार आणि रविवारी रद्द राहणार आहे. गाडी क्रमांक 22929/30 डहाणू रोड-वडोदरा-डहाणू रोड यांसह एकूण 17 रेल्वे गाड्या 31 ऑगस्टपर्यंतच्या दर शनिवारी आणि रविवारी रद्द राहणार आहेत. रद्द गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि समाज माध्यमावर उपलब्ध आहे. पश्चिम रेल्वेवरून गुजरातच्या दिशेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या वेळा पाहून निर्णय घ्यावा, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

रद्द केलेल्या गाड्या
18 ऑगस्टपर्यंत
11422 / 11421 पुणे-सोलापूर-पुणे डेमु,
12169/ 12170 सोलापूर-पुणे -सोलापूर

2 ऑगस्टपर्यंत
22882 भुवनेश्वर-पुणे एक्सप्रेस

4 ऑगस्टपर्यंत
22881 पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस

27 जुलै, 3 ऑगस्टपर्यंत
22601 चेन्नई-साईनगर शिर्डी एक्सप्रेस

29 जुलै, 5 ऑगस्टपर्यंत
22601 साईनगर शिर्डी-चेन्नई एक्सप्रेस

31 जुलै, 7 ऑगस्टपर्यंत
16502 अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस

2 ऑगस्ट, 9 ऑगस्टपर्यंत
16501 यशवंतपूर-अहमदाबाद
एक्सप्रेस, मुंबई-गदग, सोलापुर-मुंबई
सिद्धेश्वर, मुंबई-चैन्नई,काकिनाडा-
एलटीटी एक्सप्रेस

9 ऑगस्टपर्यंत
18520 लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम् एक्सप्रेस व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल.

हेही वाचा

Back to top button