‘लोणार’ चा होणार कायापालट ; ३७० कोटींचा आराखडा | पुढारी

'लोणार' चा होणार कायापालट ; ३७० कोटींचा आराखडा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा आवडता प्रकल्प समजला जातो.

नव्या आराखड्यासाठी मंजूर रक्‍कमेतून लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे विविध कामे केली जातील.

नियोजन विभागाने मंजूर आराखडयातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरीता खाते तयार करून त्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तथापि, ज्या विभागांना राज्याच्या अर्थसंकल्पा व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून निधी प्राप्त होतो ज्याची तरतूद नियोजन विभागामार्फत करणे शक्य नाही तसेच तांत्रिक कारणामुळे निधी लोणार सरोवर विकास समितीकडे वर्ग करण्याची बाब शक्य नसल्यास, अशा प्रकरणी संबंधित विभागाने आराखड्यातील कामे प्रचलित पद्धतीनुसार समितीच्या देखरेखीखाली करण्यात येईल. या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अमलबजावणी केली जाईल.

  • अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच देशातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरॅटरी, इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर आदी संस्थांनी या सरोवरावर विपूल संशोधन केले आहे.
  • हे सरोवर ज्वालामुखीप्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे पूर्वी मानले जात होते. तथापि, नंतर केलेल्या संशोधनानुसारअतिवेगवान उल्का पृथ्वीवर आदळल्याने या अंडाकृती सरोवराची निर्मिती झाली, असे सिद्ध झाले आहे.
  •  सरोवराच्या पाण्याचा रंग क्षारप्रेमी हलोआर्चिया सूक्ष्मजंतूंच्या मोठ्या उपस्थितीमुळे गुलाबी झाल्याचा निष्कर्ष पुणेस्थित एका संस्थेने केलेल्या काढला आहे.
  •  बेसाल्टिक खडकावरील उल्का प्रभावामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर एकमेवाद्वितीय असून त्याचा व्यास 1.8 किलोमीटर आहे.
  •  उच्चक्षारक्षमतेमुळे या सरोवरात मासे जिवंत राहू शकत नाहीत, तेथे केवळ एकपेशीय वनस्पतींचे अस्तित्व आढळते.
  • या विहंगम सरोवराचा उल्लेख स्कंद पुराण आणि पद्म पुराण यासारख्या प्राचीन शास्त्रांमध्येही आढळतो. 1823 मध्ये जे. ई. अलेक्झांडर हे ब्रिटिश अधिकारी या सरोवराला भेट देणारे पहिले युरोपियन होते.
  • सासू-सुनेची विहीर ः सरोवराच्या जवळच असलेल्या या विहिरीतल देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे तर तिच्या विरुद्ध बाजूचे पाणी खारे आहे. त्यामुळे विहिरीला सासू-सुनेची विहीर असे संबोधतात.
  • या सरोवराचीनिर्मिती अंदाजे 52,000 वर्षांपूर्वीची
  • कमाल खोली 150 मीटर म्हणजेच सुमारे 490 फूट
  • सरोवराचा व्यास 1.8 किलोमीटर

हेही वाचा

Back to top button