मेट्रो कारशेड प्रकल्पाजवळ बेकायदा वृक्षतोड; पर्यावरणप्रेमी आक्रमक | पुढारी

मेट्रो कारशेड प्रकल्पाजवळ बेकायदा वृक्षतोड; पर्यावरणप्रेमी आक्रमक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: गोरेगाव आरे मेट्रो कारशेडजवळ मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी सुरू असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याला विरोध दर्शवला आहे. एमएमआरसीएल आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे आरे मेट्रो प्रकल्पाजवळील झाडे छाटणी करण्याची कोणतीही परवानगी नसताना झाडे छाटण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

आरे कॉलनी परिसरात जुन्या वृक्षांची बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमीकडून करण्यात येत आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे बाहेरील कोणत्याच व्यक्तिला किंवा पर्यावरणप्रेमींना मेट्रो कारशेडजवळ जाण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांकडून सुरू आहे. काही पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड लगत असलेल्या रस्त्याची झाडांची छाटणी चालू असल्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडकडे जाणारा रस्ता सामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला असल्याचे वाहतूक विभागामार्फत परिपत्रकाद्वारे सांगण्यात येत आहे. यामुळे शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button